सोने मुल्यांकन करणाऱ्याच्या पोलीस कोठडीत वाढ

बनावट सोने खरे असल्याचे भासवून बॅंकेची 95 लाख रुपयांची फसवणूक

पुणे – बनावट सोने खरे असल्याचे सांगून जनता सहकारी बॅंकेची सुमारे 95 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणात सोन्याचे मूल्यांकन करणाऱ्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्यात आली आहे.
रवींद्र विठ्ठल पारखी (वय 59, रा. गुरुकृपा टॉवर्स, अरणेश्‍वर) असे पोलीस कोठडीत वाढ केलेल्याचे नाव आहे. याबाबत बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सुधीर राजेश्वर भालेराव (वय 48 रा. वारजे) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणा यापुर्वी शरीफ इसाक बागवान (वय 32), ओवेस सय्यद अन्सारी (वय 28), अमरीन शरीफ बागवान (तिघेही, रा. कोंढवा), तस्लीम अब्बास लकडावाला (वय 40, रा.कॅम्प), ताहीर कैजार पुनावाला (वय 28 सर्व रा. कोंढवा), आरबाज मुश्‍ताक शेख (वय 29, रा. गणेश पेठ), अदनान इक्‍बाल लोखंडवाला (वय 27, रा. घोरपडी पेठ) आणि शेख नाहेज मुशीर (भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहे. ही घटना 17 फेब्रुवारी ते 19 सप्टेंबर 2016 या कालावधीत घडली. पारखी हा जनता सहकारी बॅंकेच्या भवानी पेठ शाखेत सोन्यांचे मूल्यांकन करायचा. अटक केलेल्या सर्व आरोपींनी पारखी याच्या मदतीने बनावट पाच किलो 178 ग्रॅम वजनाचे सोने तारण म्हणून ठेऊन 94 लाख 86 हजार रुपयांचे कर्ज घेतले. या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी पारखी याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी बॅंकेतील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे का, गुन्ह्यातील रक्‍कमेतून स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे का, याच्या शोधासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने पारखी याच्या पोलीस कोठडीत वाढ केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)