सोने आयात योजनेची चौकशी करा…

भाजप खासदाराची मागणी
नवी दिल्ली – युपीए सरकारच्या काळात 80:20 या तत्वावर सोने आयातीला अनुमती देणारी एक योजना आखण्यात आली होती. त्याची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी अशी मागणी भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी लोकसभेत केली. शुन्य प्रहरात त्यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की काही बड्या मंडळींना लाभ होण्यासाठीच ही योजना आखण्यात आली त्यातून देशाच्या तिजोरीचे किमान एक लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले असा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणी तत्कालिन अर्थमंत्री, आरबीआय गव्हर्नर, अर्थ विभागाचे सचिव व अर्थ विभागाच्या अन्य संबंधीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही त्यांनी केली. ऑगस्ट 2013 मध्ये युपीए सरकारने ही योजना लागू केली होती त्यात व्यापाऱ्यांना 20 टक्के सोने निर्यातीच्या बदल्यात 80 टक्के सोने आयातीची अनुमती देण्यात आली होती. पण एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ही योजना रद्द केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)