सोनू सूदला तायक्‍वांदोमधील डॉक्टरेट

सोनू सूद हा काही अॅक्‍शन हिरो म्हणून सुप्रसिद्ध नाही. त्याच्या सिनेमांमध्ये टिपिकल बॉलीवूड अॅक्‍शन त्याने साकारली आहे हे नक्‍की. पण तशी बॉलीवूड अॅक्‍शन तर कोणताही हिरो ऍक्‍शन डायरेक्‍टरच्या मदतीने साकारू शकतो. पण सोनू सूदला अक्षय कुमार सारखेच मार्शल आर्टचे वेड आहे, हे फार कमी जणांना माहिती आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आपल्या एका सिनेमामध्ये चक्‍क जॅकी चॅनला घेतले होते, तेंव्हाच ही बाब पहिल्यांदा उजेडात आली होती.

सोनूना तायक्‍वांदोमध्ये विशेष रस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सोनूला तायक्‍वांदोमधील डॉक्‍टरेटने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. 45 वर्षाच्या सोनू सूदला आपल्या सुदृढ फिजीकसाठी तायक्‍वांदोचा विशेष फायदा झाला आहे. तायक्‍वांदोमधील आपले प्रशिक्षण आणि सातत्याचा सराव, याबरोबरच तायक्‍वांदोच्या प्रचारासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी त्याला या डॉक्‍टरेटने सन्मानित केले गेले आहे. त्याला ही डॉक्‍टरेट देण्याच्या समारंभाला “तायक्‍वांदो फेडरेशन ऑफ इंडिया’चे महासचिव प्रभात शर्मा हे देखील उपस्थित होते. यावेळी सोनूने तायक्‍वांदोच्या आपल्या प्राथमिक काळातील आठवणींना उजाळा दिला. लहानपणी आईने जेंव्हा पहिल्यांदा तायक्वांदोचा ड्रेस आणला होता, तेंव्हाची आपल्याला आठवण झाल्याचे त्याने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज तायक्‍वांदोमधील डॉक्‍टरेट स्वीकारताना आपल्या आईला अधिक आनंद झाला असता असे सांगून त्याने आईचेही स्मरण केले. तायक्‍वांदोचा प्रसार अधिक करण्यासाठी प्रोत्साहन म्हणूनच ही डॉक्‍टरेट मिळाली आहे. यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे. आता अजून खूप मोठा पल्ला पार करायचा आहे. ही तर एक सुरुवात झाली आहे, असेही तो म्हणाला. सोनूचा पुढचा सिनेमा “सिम्बा’ असणार आहे. त्यात तो रणबीर कपूर आणि सारा अली खानसोबत दिसणार आहे.

https://twitter.com/tollywoodmag/status/1044881357963501568

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)