सोनिया गांधी यांच्या मेडिकल चेकअपसाठी राहुल परदेशी रवाना

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या आईच्या, सोनिया गांधींच्या उपचारांसाठी परदेशात जाणार आहेत. ‘सोनियांजींच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी मी त्यांच्यासोबत भारताबाहेर जाणार आहे,’ असे टि्वट करत राहुल यांनीच ही माहिती दिली आहे. पण या टि्वटमध्येही राहुल भाजपला चिमटा काढायला विसरले नाहीत.
टि्वटमध्ये पुढे राहुल लिहितात, ‘भाजप सोशल मीडिया ट्रोल आर्मीच्या माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जास्त काम करू नका… मी लवकरच परत येईन!’ राहुल यांच्या मागील विदेशवारीच्या वेळी त्यांना भाजपने ट्रोल केले होते. त्या पार्श्वभूमीवर आपल्या परदेशवारीवरचा सस्पेन्स संपवत राहुल यांनी भाजपला जाता जाता चिमटा काढला आहे.
 काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच राहुल आणि सोनिया परदेशात रवाना झाले आहेत. सोनिया दरवर्षी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशी जातात. २०११ मध्ये अमेरिकेत त्यांच्यावर सर्जरी झाली होती. राहुल गांधी एका आठवड्यातच भारतात परतणार असून सोनिया मात्र अधिक काळ परदेशात राहतील, असे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, राहुल गांधी यांच्या या विदेशवारीमुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारने मंत्रीमंडळ वाटपही तूर्त टाळले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)