दापोडी – मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तरूणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना बोपोडी येथे भाऊ पाटील रस्त्यावर घडली.
सनी जेम्स टी. एम. जेम्स (वय-30, रा. तोरण हौसिंग सोसायटी, खडकी) याने फिर्याद दिली आहे. 19 एप्रिल रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास सनी घराजवळ मॉर्गिंक वॉक करत होता.
शिवा सोसायटीजवळ दुचाकीवरून दोन जण त्याच्याजवळ आले. त्यांनी सनीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सनीने प्रतिकार केल्याने चोरट्यांनी पळ काढला. फौजदार मदन कांबळे तपास करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0