सोनसाखळी चोरट्यांचा पुणे शहरात धुमाकूळ

शहरात एकापाठोपाठ सहा घटना : ज्येष्ठ महिला टार्गट


3 लाख 26 हजाराच्या सोनसाखळ्या चोरल्या

पुणे – पुणे शहरात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. समर्थ, विश्रामबाग, फरासखाना, वानवडी आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या भागांत चोरट्यांनी एकापाठोपाठ सहा सोनसाखळ्या चोरल्या आहेत. अवघ्या काही तासांत ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष करत या चोऱ्या केल्या. यामध्ये 3 लाख 26 हजारांच्या सोनसाखळ्या चोरण्यात आल्या.

लक्ष्मी रस्त्यावरील लोखंडे तालीमजवळ एक ज्येष्ठ महिला पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले. त्यानंतर काही वेळातच फडके हौद चौकाजवळ एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. आरसीएम कॉलेजजवळ ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. वानवडी येथे एका पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाल्यानंतर चोरट्यांनी बिबवेवाडी परिसरात कॅनरा बॅंकेजवळून पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील हार हिसकावून नेला. यानंतर समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडीचे मैदान येथे देखील एका महिलेची सोनसाखळी हिसकावली. याप्रकरणी फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

सोनसाखळी चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी तातडीने शहरात नाकाबंदी केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजही तपासून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन आणी गुन्हे शाखेची पथके चोरट्याच्या मागावर पाठवण्यात आली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.