सोनम वांगचुक, भारत वाटवानी यांना रॅमन मॅगसेसे

मनिलात 31 ऑगस्ट 2018 रोजी होणार पुरस्काराचे वितरण
मनिला – आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा हा पुरस्कार दोन भारतीयांना घोषीत करण्यात आला आहे. सोनम वांगचूक आणि भारत वाटवानी हे रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या पुरस्काराचे वितरण 31 ऑगस्ट 2018 रोजी मनिला येथे करण्यात येणार आहे.

सोनम वांगचुक यांनी लडाखसारख्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आईस स्तूप बनवले. लाखो लोकांना/मुलांना प्रयोग करण्याची, नव्या उपक्रमांची प्रेरणा दिली. याच कार्याची दखल घेत त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर बेघर मनोरुग्णांवर उपचार करुन त्यांची कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवण्याचे महत्त्वाचे काम केल्याने भारत वाटवानी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारत वाटवानी हे श्रद्धा पुनर्वसन फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत.

हा पुरस्कार दोन भारतीयांसह युक चांग (कंबोडिया), मारिया डी लोर्डस मार्टिंस क्रूझ (तिमोर), कम्युनिस्ट बंडखोरांशी शांतता चर्चा करणारा फिलिपाईन्स नागरिक होवर्ड डी आणि अपंगाबाबत होणाऱ्या भेदभावाविरुद्धच्या लढणारा पोलियोग्रस्त व्ही. टी. होआंग येन रोम (व्हिएतनाम) यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती रॅमन मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष कारमेनसिता अबेला यांनी दिली.

दरम्यान, फिलिपाईन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने मागील 60 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. रॅमन मॅगसेसे यांचा 1957 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)