सैनिक हो तुमच्यासाठी…

सांगवी – कारगिल विजयी दिनाचे औचित्य साधून देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी एक हजार पाचशे राख्या पाठवल्या आहेत.
भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगवीच्या कै .सौ .शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा, शिशु विहार, नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदराबाई भानसिंग हुजा गुरू गोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल, आयडियल सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल सांगवी शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक हजार पाचशे राख्या तयार करुन कारगिल विजयदिनी राख्या पाठवल्या. शाळेच्या मैदानावर संस्थेचे खजिनदार मा .रामभाऊ खोडदे यांच्या हस्ते कारगिल विजयी ज्योत, राख्या व शहीद कप्टन विक्रम बात्रा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार रामभाऊ खोडदे संस्थेचे सचिव परशुराम मालुसरे , शाळेच्या शिक्षक पालक संघ व व्यवस्थापण समितीचे सर्व सदस्य, सर्व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संस्थेचे खजिनदार रामभाऊ खोडदे म्हणाले की अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो .देश भक्तीचे महत्व कळते स्वतः बनविलेल्या कलाक्रुतीचा आनंद मिळतो तो वेगळाच .मुख्याध्यापक शिवाजीराव माने व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या सीमेवरील जवानांच्या आनंदात सहभागी होण्याचा छोटासा प्रयत्न शाळेने केला आहे, असे मुख्याध्यापक शिवाजीराव माने म्हणाले. यावेळी त्यांनी विजय दिन, शहीद कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या शौर्याची महिती सांगितली.

शिक्षक दत्तात्रय जगताप यानी कार्यकर्माचे सूत्रसंचलन केले व आभार भाऊसाहेब दातीर यानी मानले. या उपक्रमासाठी इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरठी, स्वप्निल कदम, कैलास म्हस्के, सुनिता टेकवडे, हेमलता नवले, सीमा पाटील, मनीषा लाड, शीतल शितोळे, दीपाली झणझणे, स्वाती दिघे, सुरेखा खराडे, श्रध्दा जाधव, संध्या पुरोहित, संगीता सूर्यवंशी, नीता ढमाले, निर्मला भोइटे, ममता सावंत, स्वाती भोले, पूजा ढमढेरे, नेहा मांजरे, शीतल गरसूंड, पल्लवी व्हराडी, रेश्‍मा आव्हाड, जोत्स्ना बनसोड, प्रियंका लांडे, अश्विनी रोंदाले, ज्योती ठुबे, कुसुम ढमाले, मनीषा गायकवाड चेतना इंगळे यानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)