सैनिक वसतिगृहात वृक्षतोड

65 झाडांची कत्तल :वन विभागाने केली कारवाईला सुरुवात
गोडोली, दि. 27
वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाच्या वतीने व्यापक जनजागृती करून 50 कोटींची वृक्षलागवड करण्याचा मानस शासन राबवत असतांना साताऱ्यातील करंजे येथील सैनिकांच्या पाल्यांसाठी असलेल्या वसतिगृहातील सुमारे 65 झाडांची कत्तल झाली आहे. दरम्यान वन विभागाने येथील पंचनामा करून कारवाईला सुरुवात केली आहे.दरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचा खुलाहा संबंधितांनी केला आहे.

सातारा शहरालगत आजी माजी सैनिकांच्या मुला-मुलींचे वसतिगृह असून याठिकाणी प्रत्येकी दोन सुपरवायझरांसह अन्य आवश्‍यक मनुष्यबळ असून सैनिकांच्या पाल्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. मात्र, वनराईने नटलेल्या याच परिसरात गेल्या आठ दिवसात सुबाभूळ, निलगिरी, गुलमोहर आणि बदाम अशा सुमारे 65 मोठया झाडांची तोड दोन मक्तेदारांकडून करण्यात आली आहे. याबाबत घटनास्थळ, वनविभाग आणि शाहूपुरी ग्रामपंचायतीतून माहीती घेतली असता, ही झाडे तोडण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले असून वनविभागाकडून तोडण्यात आलेल्या झाडांचा पंचनामा करण्यात आला असून तोडलेली झाडे वाहतूक करून कोठे नेण्यात आली, याचा शोध सुरु आहे. वास्तविक हे वृक्ष तोडण्यापूर्वी शाहूपुरी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्‍यक होती. मात्र, केलेली वृक्षतोड बेकायदेशीर असून याबाबत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमीमधून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)