सेवापूीर्ती गौरव समारंभ कौतुकास्पद

पिरंगुट- आई-वडिलांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळे शनिवारी (दि.29) शामकिशोर येवले यांच्यासारखे शिक्षक मिळाले आहेत. त्यांनीही विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून भावी पिढी सक्षम केली आहे. त्यामुळेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ केला आहे. ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी उपसचिव जे.एम. डुंबरे यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कूलमधील उपशिक्षक शामकिशोर येवले हे 32 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळी जे. एम. डुंबरे बोलत होते. यानिमित्त शामकिशोर येवले यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य के.टी. सोनवणे, माजी सभापती बाळासाहेब पवळे, माजी आदर्श सरपंच बाळासाहेब गोळे, रामभाऊ निकटे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, सरपंच सुप्रिया धोत्रे, उपसरपंच दिलीप पवळे, माजी उपसरपंच रामदास पवळे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे, प्राचार्य सुनील लाडके, पर्यवेक्षिका दमयंती गायकवाड, राहुल पवळे, विशाल पवळे आदी मान्यवर, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी के. टी. सोनवणे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनाची शिदोरी दिली पाहिजे. प्रत्येकाचे व्यक्तीतमत्त्व हे स्वच्छ असले पाहिजे.
सत्काराला उत्तर देताना शामकिशोर येवले म्हणाले, 32 वर्षांच्या सेवेत अनेक माजी विद्यार्थी घडले. आज हेच माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. याच विद्यार्थ्यांकडून काम करण्याची ताकद मिळते. आजचा सेवापूर्ती गौरव समारंभ म्हणजे केलेल्या कामाची पोच पावती आहे. प्रास्ताविक प्राचार्य सुनील लाडके यांनी केले. आभार पर्यवेक्षिका दमयंती गायकवाड यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)