सेवानिवृत्तांचा फायदा समाज जडणघडणीसाठी व्हावा 

जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले : वासुंदे येथे चार शिक्षकांचा सेवानिवृत्ती समारंभ
पारनेर – विविध शासकीय सेवेतून कर्मचारी सेवानिवृत्त होतात.त्यानंतर सेवानिवृत्तांचा खरा फायदा समाजाच्या जडणघडणीसाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्‍त केली.
वासुंदे (ता. पारनेर) येथील स्व. वसंतराव झावरे पाटील सभागृहात शिक्षक बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बा. ठ. झावरे यांच्यासह प्राथमिक शिक्षक मारूती उगले, बबन तळेकर, हिराबाई हिंगडे/झावरे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, जि. प. सदस्या सुप्रिया झावरे, अजय फटांगरे, शिक्षक नेते संजय कळमकर, रा. या. औटी, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, वृषाली कडलग, माजी मुख्याध्यापक विष्णू जाधव, विलास झावरे, उमाजी वाळुंज, दिलीप ठुबे, अशोक कटारिया, राजेश भंडारी, नंदकुमार औटी आदी उपस्थित होते.
घुले म्हणाल्या, सेवानिवृत्तांनी पुढील काळात आपल्या अनुभवाच्या व बुद्धीच्या बळावर शिक्षण क्षेत्राला मार्गदर्शन करावे. जि. प. मार्फत विविध शैक्षणिक उपक्रम व धोरणे यापुढील काळात शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षणातून सुसंस्कृत समाज निर्माण झाला पाहिजे. जिल्हा परिषद शाळांकडे इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत कल वाढत चालला आहे. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सेवानिवृत्तीनंतरही अविरत काम केले पाहिजे, अशी अपेक्षा सुजित झावरे यांनी व्यक्‍त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)