सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत चोरी

सातारा,दि.20 (प्रतिनिधी)
सातारा शहरातील सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत अज्ञाताने चोरी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संस्थेचे सचिव जगन्नाथ निवळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी संस्थेच्या शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे शटर अज्ञाताने तोडून चोरी केली. कार्यालय नेहमीप्रमाणे दि.18 रोजी बंद करून कर्मचारी गेले होते. मंगळवारी सुट्टी असल्याने कार्यालय बंद असल्याने कर्मचारी आले नव्हते. बुधवारी कामकाजाचा दिवस असल्याने कार्यालयातील शिपाई झाडलोट करण्यासाठी आला होता. त्यावेळी कार्यालयाच्या मुख्य शटरचे कुलूप तोडल्याचे शिपायाच्या लक्षात आल्याने, त्याने तात्काळ वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सचिव व इतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची पाहणी केली तेव्हा सर्व साहित्य अस्थाव्यस्त पडलेले त्यांच्या लक्षात आल्याने चोरीचा संशय आल्याने लॉकरची पाहणी केली. तेव्हा लॉकरमधील रोख रक्कम 64 हजार नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.