सेलिंग क्रीडा प्रकारात भारताला तीन पदक एक रौप्य तर दोन कांस्यपदकांचा समावेश

जकार्ता: इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सेलिंग या क्रीडा प्रकारात 3 पदकांची कमाई केली आहे. 49 ईआर एफएक्‍स प्रकारात भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेर्वेगर या जोडीने रौप्य पदकाची कमाई केली. सेलिंगया क्रीडा प्रकारात यंदाच्या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक ठरल आहे.

यानंतर भारताच्या हर्षिता तोमरने ओपन लेजर 4.7 प्रकारात कांस्यपदक पटकावलं. याचसोबत वरुण ठक्कर आणि गणपती चेंगप्पा जोडीने 40 इआर मेन्स प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

20 वर्षीय श्वेता आणि 27 वर्षीय वर्षा यांच्या जोडीने पहिल्या 15 प्रयत्नांनंतर 40 गुणांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर 16 वर्षीय हर्षिता तोमरने 12 प्रयत्नांनर 62 गुणांची कमाई केली. माझ्यासाठी हा अनुभव शब्दात न सांगणारा आहे. माझ्यासारख्या तरुण खेळाडूसाठी ही स्पर्धा एक चांगला अनुभव ठरला आहे. कांस्यपदक विजेत्या हर्षिता तोमरने आपली भावना व्यक्त केली.

प्रयत्नांचा अंत पहाणारी स्पर्धा होती – वर्षा गौतम

49 ईआर एफएक्‍स प्रकारात भारताच्या वर्षा गौतम आणि श्‍वेता शेर्वेगर या जोडीने रौप्य पदकाची कमाई केली. सेलिंगया क्रीडा प्रकारात यंदाच्या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक ठरल आहे. स्पर्धेनंतर बोलताना भारताच्या वर्षाने सांगितले की, हि स्पर्धा ग्लॅमरस नसून आपल्या प्रयत्नांचा अंत पहाणारी स्पर्धा होती. स्पर्धेच्या वेळी मी आणि माझी सहकारी श्‍वेता शेर्वेगरने सर्व प्रयत्न पणाला लावले त्यामुळे आजच्या स्पर्धेत आम्ही पदक मिळवू शकलो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)