सेरेना-व्हीनस तिसाव्यांदा लढणार

सहा वेळची विजेती सेरेना विल्यम्स आणि दोन वेळची विजेती व्हीनस विल्यम्स यांच्यात महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत लढत रंगणार आहे. या दोघींमधील ही एकूण तिसावी लढत ठरणार आहे. सेरेना व व्हीनस सर्वात पहिल्यांदा 1998 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकमेकींविरुद्ध लढल्या होत्या. सेरेनाकडे सध्या 17-12 अशी आघाडी आहे. तरीही या वेळची लढत आपल्याला तितकीशी सोपी जाणार नाही, अशी कबुलीही तिने दिली.

सेरेनाने केरिन विथॉफ्टचा 6-2, 6-2 असा फडशा पाडला, तर व्हीनसने कॅमिला गिओर्गीवर 6-4, 7-5 अशी मात केली. महिला एकेरीतील अन्य लढतींमध्ये एकेटेरिना माकारोव्हाने नवव्या मानांकित ज्युलिया जॉर्जेसला 7-6, 6-3 असे चकित केले. तसेच कॅरोलिना मचोव्हाने 12व्या मानांकित गार्बिन मुगुरुझावर 3-6, 6-4, 6-4 अशी सनसनाटी मात करीत तिसरी फेरी गाठली. व्हिक्‍टोरिया आझारेन्काने 25व्या मानांकित दारिया गाव्हरिलोव्हाला 6-1, 6-2 असा बाहेरचा रस्ता दाखविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच गतविजेती स्लोन स्टीफन्स, सातवी मानांकित एलिना स्विटोलिना, आठवी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा, 15वी मानांकित एलिसे मेर्टेन्स, 18वी मानांकित ऍश्‍ले बार्टी, 19वी मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हा व 23वी मानांकित बार्बरा स्ट्रायकोव्हा या महिला मानांकितांनी आपापले सामने जिंकताना तिसऱ्या फेरीत धडक मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)