सेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

मेलबर्न: अमेरिकेची महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सला झेक प्रजासत्ताकाची खेळाडू कॅरोलिना लिस्कोवाने 6-4, 4-6 आणि 7-5 असे पराभूत करत ऑस्ट्रेलियान ओपनमध्ये मोठ्या उलटफेराची नोंदकरताना उपांत्यफेरीत स्थान निश्‍चित केले. तर नाओमी ओसाकाने एलिना वितलीनाचा 6-4, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यफेरी गाठली. तर पुरुषांच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असललेल्या नोवाक जोकोविच आणि केई निशिकोरी यांच्यातील सामन्यात जायबंदी झाल्याने निशिकोरीने सामन्यातून माघार घेतल्याने जोकोव्हिचनेही उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

23 ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या सेरेना विरुद्ध कॅरोलिनाने पहिला सेट 6-4 असा आरामात जिंकला. मात्र दुसऱ्या सत्रात तिला विजयी लय कायम ठेवता आली नाही. दुसरा सेट 6-4 असा जिंकता सेरेनाने पुनरागमन केले. त्यामुळे सामन्याचा निकाल हा तिसऱ्या आणि निर्णायक सेटपर्यंत लांबला. या सेटमध्ये प्रथम सेरेनाने आपल्या अनुभवाच्या आणि आक्रमक खेळाच्या जोरावर 5-1 अशी आघाडी घेतली. परंतु, त्यानंतर काही टाळता येणाऱ्या चुका केल्याचा फटका बसला आणि तिला सामना 7-5 असा गमावून स्पर्धेबाहेर जावे लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोकोव्हिच आणि निशिकोरी यांच्यात झालेल्या सामन्यात पहिला सेट जोकोव्हिचने 6-1 असा सहज जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये निशिकोरीने उजव्या मांडीचे स्नायू दुखवल्याने माघार घेतली आणि त्यामुळे जोकोव्हिचला विजयी घोषित करून पुढे चाल देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)