‘सेक्‍सी दिसण्यापेक्षा असणे अधिक महत्त्वाचे’- विद्या बालन 

विद्या बालनच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाची कोणालाही नव्याने ओळख करून देण्याची आवश्‍यकता नाही. तिच्या आतापर्यंतच्या करिअर ग्राफकडे एक नजर टाकली तरी हे सहज लक्षात येऊ शकते. तिची सिनेमांची निवड आणि त्यातल्या तिच्या रोलला तिने दिलेला न्याय निर्विवाद आहे.

अशावेळी तिने केलेले मतप्रदर्शनही महत्त्वाचे आहे. “सेक्‍सी दिसण्यापेक्षा सेक्‍सी असणे अधिक चांगले आहे.’ असे ती अलीकडे म्हणाली ते काही उगीच नाही. विद्याची ओळख केवळ “डर्टी पिक्‍चर’ पुरती मर्यादित नाही, तर हिंदीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक अशी आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील सगळ्या आयटम हिरोईनसाठी तिचे हे वक्‍तव्य विशेष महत्त्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या तिच्या “तुम्हारी सुलू’ला प्रेक्षकांनी फारच चांगला प्रतिसाद दिला आहे. “तुम्हारी सुलू’मध्ये विद्याने रेडिओ जॉकी बनलेल्या एका मध्यमवर्गीय गृहिणीचा केलेला रोल तिच्या करिअरमधील आणखी एक महत्वाचा सिनेमा ठरावा. स्वतः विद्याने “डर्टी पिक्‍चर’ आणि “तुम्हारी सुलू’ची तुलना केली आहे. हे दोन्ही सिनेमे महिला प्रधान आहेत. मात्र यातील नायिकेची व्यक्‍तिरेखा एकमेकांपासून पूर्ण भिन्न आणि विरोधी आहे.

“डर्टी पिक्‍चर’मध्ये सिल्क आपल्या शरीराचा वापर एखाद्या करन्सीप्रमाणे करते. तर सुलू साहस आणि आत्मविश्‍वासाच्या आधारे यश मिळवते. महिला लेट नाईट जॉब करू शकत नाहीत आणि सेक्‍सी असण्यासाठी स्कर्टच घातला पाहिजे, हा भ्रम सुलूने तोडला आहे. हा सिनेमा करण्यापूर्वी लग्नाला 12 वर्षे झालेली एक महिला रात्री उशिरापर्यंत अनोळखी लोकांबरोबर खासगी गोष्टींवर रेडिओवरून गप्पा मारू शकेल, अशी कल्पना मी स्वतः देखील केली नव्हती, असेही विद्या म्हणाली.

म्हणूनच केवळ सेक्‍सी दिसणे महत्त्वाचे नाही. तर असणेही महत्त्वाचे आहे. आपल्या खासगी वैवाहिक आयुष्याबद्दल सुलू आपल्या पतीशीही अगदी सहज बोलून जाते. हे मला अभिप्रेत असलेले “सेक्‍सी असणे’ आहे, असे विद्या म्हणते आणि आपल्या मताचे निर्विवाद समर्थनही करते. आहे की नाही बिनतोड युक्‍तिवाद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)