सॅमसंग ठरला भारतातील मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड

मुंबई  – 16 शहरांतील ग्राहकांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या टीआरएचा ब्रॅंड ट्रस्ट रिपोर्ट 2018 (बीटीआर 2018) नुसार सलग दुसऱ्या वर्षी सॅमसंगने आघाडी घेतली असून, भारतातील मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड ठरण्याचा मान मिळवला आहे. सोनी व एलजी यांनी 2017 मधील स्थान कायम राखत, दुसरा व तिसरा क्रमांक यंदाही कायम ठेवला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी सॅमसंगला मिळालेले भारतातील मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड हे स्थान ब्रॅंडचा विश्‍वास निर्माण करण्यावरील भर व बांधिलकी दर्शवते. सोनी व एलजी यांनी गेल्या चार वर्षांमध्ये सातत्य दाखवले आहे व गेली चार वर्षे आघाडीच्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवले आहे.

टाटा हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड आहे आणि त्यानंतर ऍपल या तंत्रज्ञान कंपनीला स्थान मिळाले असून ,कंपनीचा क्रमांक गेल्या वर्षीच्या तुलनेत एकने घसरला आहे. तसेच, डेलने आघाडीच्या 10 मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंडमधले स्थान कायम ठेवले आहे व 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये आणखी दोन स्थान वर सरकत 6 वा क्रमांक मिळविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)