इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओजची बॅंक

सृजनशील शिक्षकांच्या मदतीने ई कंटेटची निर्मिती
पुणे – राज्यातील सृजनशील शिक्षकांच्या मदतीने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून ई साहित्याची निर्मिची केली जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते पाचवीच्या पुस्तकातील साहित्यावर आता व्हिडिओज पहायला मिळणार आहेत. यापुर्वी या क्‍यू आर कोडच्या माध्यमातून केवळ पीडीएफ स्वरुपातील पुस्तक पहायला मिळत होते मात्र आता अनेक व्हिडिओज विद्यार्थ्यांना पहाता येणार आहे.

परिषदेत राज्यातील पन्नास ते पंचावन्न सृजनशील शिक्षकांनी मिळून काही इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासाशी संबंधिकत ई साहित्याची निर्मिती केली. यामध्ये सोप्या पध्दतीने गणित कसे शिकावे, विज्ञानातील गंमती जमती, मराठीच्या कवितांना चाली अशा प्रकारचे व्हिडिओज तयार करण्यात आले. हे व्हिडिओज सहामाईच्या अभ्यासक्रमापर्यंतच करण्यात आले आहेत. त्यानंतर पुढील अभ्यासक्रमाचे व्हिडिओजची निर्मिती केली जाणार आहे. शासनाचे मित्रा ऍपवरही हे व्हिडिओज उपलब्ध होणार आहेत.
राजकिरण चव्हाण, ई निर्मितीत सहभागी शिक्षक

ऑडिओ, व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची गरज सर्वाधिक प्रमाणात लहान मुलांना असते. जेणेकरुन अभ्यास सोपा करुन त्यांना तो शिकवता येतो. आतापर्यंत इयत्ता पाचवी, सहावी, दहावीच्या पुस्तकात हे क्‍यू आर कोड देण्यात आले आहेत. मात्र येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रत्येक पुस्तकामध्ये हे क्‍यू आर कोड छापण्यात येणार असून त्याकोडसाठी ई साहित्याची निर्मिती करण्याचे काम सध्या सुरु आहे. याबाबत 24 ते 26 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र विद्या प्राधिकरण येथे शिक्षकांची कार्यशाळा झाली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)