सूनेसोबत अनैतिक संबंध : मुलाची पित्याने केली निर्घृण हत्या

औरंगाबाद – औरंगाबाद येथे बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सूनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची पित्याने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यातील केळगावमध्ये घडली. 66 वर्षीय दादाराव कोल्हे यांचे आपल्याच सुनेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र या संबंधांमध्ये मुलगा प्रभाकर कोल्हे अडथळा ठरत होता. त्यामुळे आरोपीने मुलाचा काटा काढण्याचे ठरवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभाकर यांची हत्या करुन आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि उकिरड्यात पुरले. त्यानंतर आपला मुलगा 14 तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार स्वतः आरोपी वडिलांनीच दिली.

फिर्यादीनुसार औरंगाबादेतील सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र तपासामध्ये पित्यानेच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि पोलिसही चक्रावून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)