सुष्मिता सेनच्या घरी लग्नाची लगबग

अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घरी लवकरच लग्नाची शहनाई वाजणार आहे. पण ही शहनाई सुष्मिताच्या नव्हे तर तिच्या भावाच्या लग्नाची वाजणार आहे. सुष्मिताचा छोटा भाऊ राजीव सेन लवकरच बाहुल्यावर बसणार आहे. त्याचा विवाह “मेरे अंगने में’ या मालिकेतील नायिका चारु असोपा हिच्याशी होणार आहे. याबाबतची माहिती सुष्मिताने आपल्या इंस्टाग्रामवरून दिली आहे.

सुष्मिताने पोस्टमध्ये आपल्या भावाला जगातील सर्वात नशिबवान असल्याचे सांगत लिहिले की, तिने (चारू असोपा) होकार दिला आहे. राज भैया तु जगातील सर्वात नशिबवान आहेस. या परीला आमच्या जीवनात सहभागी करू घेत असल्याबद्‌द तुझे आभार. चारू आणि राज भैयाला खूप खूप शुभेच्छा. या लग्नाची मला खूप दिवसांपासून उत्सुकता आहे. या लग्नात मी दोघांच्या वतीने डान्स करेन, असेही तिने म्हटले आहे.

दरम्यान, सुष्मिता सेनच्या भावाला लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती, सुष्मिता सेन ही केव्हा लग्नबंधनात अडकणार. पण सध्या सुष्मिता ही तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करत आहे. रोहमनच्या रिलेशनशिपबाबत ती खूपच गंभीर आहे. सुष्मिताने नुकताच त्याच्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.