सुळेंना अशी भाषा शोभत नाही : रहाटकर

पुणे – बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच त्या अशी शिवराळ भाषा वापरत असल्याची टीका भाजपच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली.

बारामतीमधून त्यांचा पराभव होणार असल्याचे दिसत असल्यामुळेच त्यांनी असे संभाषण केलेले असावे, दोन टर्म खासदार असणाऱ्या सुळे यांना अशी भाषा शोभत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरुवारी रहाटकर यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. देशात सगळीकडे भाजपसाठी चांगले वातावरण असून आम्हाला शंभर टक्‍के यश मिळणार आहे. विरोधी पक्षामध्येच अस्वस्थतेचे वातावरण आहे. सगळे पक्ष एकत्र येऊन त्यांची महामिलावट गॅंग तयार झाली आहे. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्‍वास नाही. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत जी महिलांसाठी कामे केली आहेत. त्यामुळे महिलांचे तर मत मोदी यांनाच आहे, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.