सुरेश जैन यांना वैद्यकीय जामीन मंजूर

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरण ः तीन महिन्यांसाठी दिलासा
मुंबई : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवून धुळे सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या माजी मंत्री सुरेश जैन यांना उच्च न्यायालयाने तात्पूरता दिलासा दिला आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे सध्या जेजे रूग्णालयातील जेल वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या जैन यांना वैद्यकिय कारणास्तवा तीन महिन्यांसाठी पाच लाखाच्या तात्पूरता जामीनावर सुटका केली.

जळगावात 1990 साली झालेल्या 29 कोटीच्या घरकुल योजनाघोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन तसेच राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह 48 जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा आणि 100 कोटीं रुपये दंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर अटकेचे आदेश दिले. यानंतर आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तर काही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रमुख आरोपी असलेल्या सुरेश जैन यांना दिलासा मिळाला नव्हता.

सुरेश जैन यांनी धुळे सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करून खटल्याची अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, जेजे रुग्णालयात वैद्यकिय उपचार घेत असलेल्या जैन यांच्या वतीने ऍड. आबाद पोडा यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकिय कारणास्तत वळावा अशी विनंती करणार अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती रणजीत मोर आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी जैन यांना खासगी सेफी रूग्णालयात वैद्यकिय उपचारासाठी दरदिवशी जावे लागत असल्याने त्यांना जामीन मंजूर करावा, अशी विनंती ऍड. आबाद पोंडा यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत जैन यांना पाच लाखाचा तीन महिन्यासाठी वैद्यकिय कारणास्तव जामीन मंजूर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.