सुरूर येथील उड्डाण पुलाला गेला तडा

सुरुर : आशियाई महामार्गावरील सुरुर उड्डाण पुलाला निकृष्ठ बांधकामामुळे काँक्रीटचा कोसळलेला भाग.

सिमेंटचे मोठाले ढपले पडले सुरूर महाबळेश्वर रस्त्यावर

करुणा पोळ
कवठे, दि. 29 – आशियाई महामार्गावरील सुरूर उड्डाण पुलाला पुन्हा तडा गेल्यामुळे या भागातील वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे. पुलाचे वारंवार पडझड होत असल्याने या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने स्पष्ट झाले असून धोकादायक पूल बनवून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकदार कंपनीवर कारवाई करण्याची गरज आहे.
सुरूर, भुईंज व पाचवड या तिन्ही उड्डाण पुलांपैकी सुरूर येथील उड्डाण पूल हा प्रतिवर्षी पडझडीच्या बाबतीत चर्चेत राहिला आहे. पाचवड येथील उड्डाणपूल गेली कित्येक दिवस दुरुस्तीसाठी बंद असून तेथील वाहतूक सेवा रस्त्याने सुरु असून खड्ड्यांच्या साम्राज्यातून बिकट वाट काढत वाहनचालक आपली वाहने चालवीत आहेत. दरम्यान, सुरूर उड्डाणपुलाच्या स्लॅबचे टपरे पुलाखालील भागामध्ये कोसळल्याने सुरूर येथील पुणे ते सातारा या लेनवरील उड्डाण पूल नुकताच वाहतुकीसाठी बंद केला आहे. या लेनवरील सर्व वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आलेली आहे. धीम्यागतीने सुरू असलेले सुरूर येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याबरोबर पहिल्यांदा 5 जून 2016 रोजी या उड्डाण पुलाच्या सातारा पुणे लेनवर तडे गेले होते व हा भाग वाहनांच्या झुलता पूल असल्यासारखा हलत होता. त्यावेळी पहिल्यांदा हा पूल वाहतुकीला बंद ठेवून दुरुस्ती करून पुन्हा काही कालावधीने सुरु करण्यात आला. त्यानंतर बरोबर पुढच्याच वर्षी 9 मार्च 2017 रोजी पुन्हा पुलाच्या याच भागालगत पुन्हा सिमेंटचे टपरे कोसळू लागल्याने पूल वाहतुकीला बंद करून पुलावरील मोठा भाग काढून पुन्हा नव्याने दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतर दीड वर्षाचा कालावधी पूर्ण करीत महिन्यांनी आता या पुलाच्या कॉंक्रीटचा भाग कोसळल्याने प्रतिवर्षी या पुलाची पडझड होत असल्याने पुलाच्या एकंदरीत कामाबद्दल व आयुष्यमानाबद्दल परिसरातील नागरिकांना शंका वाटत आहे. एकंदरीत या परिसरातील सर्वच उड्डाण पुलांच्या बाबतीत विश्वासार्हतेबाबत साशंक असलेले नागरिक या भागातील कोणत्याही पुलाखालुन जाताना भीतीच्या छायेखाली प्रवास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

खड्डे चुकवायचे का सिमेंटच्या ढपल्या
पावसाळ्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनचालकांनी रस्त्यातील खड्डे चुकवण्यासाठी रस्त्यावर नजर केंद्रित करण्याची आवश्‍यकता असल्याने तसेच उड्डाण पुलाखालून प्रवास करताना पुलाचे कॉंक्रीट कोसळत असल्याने पुलाकडे वर बघून वाहन चालवण्याची गरज भासते. यामुळे नक्की वाहन कसे चालवावे हा प्रश्न वाहनचालकांना भेडसावत असून प्रतिवर्षी सुरूर, भुईंज व पाचवड येथील उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद राहत असतील तर खड्डेमय रस्त्यातून प्रवास करून टोलनाक्‍यावर भरमसाठ टोल तरी का भरावा हा प्रश्न वाहनचालक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)