सुरक्षित हवाई वाहतुकीसाठी सुयोग्य उपकरण निर्मितीवर भर-सुरेश प्रभू

नवी दिल्ली – मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत विमाने आणि हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित उपकरणांची निर्मिती, हवाई वाहतूक क्षेत्रासाठीची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य असून, त्याचबरोबरीने भारतात जागतिक तोडीच्या माल आणि प्रवासी हब निर्मितीलाही आपले प्राधान्य असल्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.

विमान वाहतूक उद्योगाशी संबंधितांच्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. विविध विमान वाहतूक कंपन्यांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, विमानतळ संचालक, तसेच प्रवासी सेवा, सुरक्षितता, पायाभूत सुविधा, इत्यादी सेवांशी संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. हवाई वाहतूक उद्योग क्षेत्रातली वाढ, जागतिक तोडीची राहील, याची खातरजमा करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर अशा बैठका आयोजित केल्या जातील अशी माहिती प्रभू यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)