सुरक्षित मतदार संघासाठी सिद्धरामैय्या यांची पळापळ – शहा

अमित शहा यांची टीका
बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्यावर राज्यातील कॉंग्रेची भिस्त आहे मात्र त्यांची स्वताचीच सुरक्षित मतदार संघासाठी पळापळ सुरू झाली असून त्यांना तेथे दोन मतदार संघातून निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. कोप्पाल जिल्ह्यातील एका जाहीरसभेत बोलताना ते म्हणाले की सिद्धरामैय्या यांनी चांमुडेश्‍वरी मतदार संघातू बदामी मतदार संघात पळ काढला. ते आणकी किती काळ अशी पळापळ करणार? आमचे उमेदवार बी श्रीमालू हे तुम्हाला पराभूत करतील असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की राहुल गांधी येथे येऊन राष्ट्रीय प्रश्‍नांवर मोदींना प्रश्‍न विचारतात. त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे आम्ही देऊच पण आता उत्तरे देण्याची तुमची वेळ आहे कारण या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका असून तेथे तुम्ही सत्तेवर आहात. आम्ही केंद्रात सत्तेवर असताना झालेल्या प्रत्येक रूपयाच्या खर्चाचा हिशोब आमचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर देऊ असे ते म्हणाले.

कर्नाटकात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढला असल्याचा आरोपही त्यांनी केला. सिद्धरामैय्या यांच्याकडे चाळीस लाखांचे घड्याळ आहे त्याचा उल्लेख करून शहा म्हणाले की त्यासाठी त्यांच्याकडे इतके पैसे कोठून आले? की त्यांना हे घड्याळ कोणी भेट दिले? याची माहिती त्यांनी का लपवली असे प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. सिद्धरामैय्या यांनी 2 मार्च 2016 रोजी हे घड्याळ कर्नाटक विधानसभेच्या सभापतींकडे सुपुर्त केले आहे.

राज्याच्या तिजोरीत त्यांनी हे घड्याळ सुपुर्त केले असले तरी त्यांना ते कोठून मिळाले?याची माहिती त्यांनी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)