सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेवरून “ब्रिक्‍स’मध्ये दुफळी नको – सुषमा स्वराज

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेवरून ब्रिक्‍स संघटनेत दुफळी निर्माण होता कामा नये, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे 73 वे अधिवेशन सुरू आहे. त्याच वेळी ब्रिक्‍स संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही बैठक घेण्यात आली. त्यात स्वराज यांनी हे विचार मांडले.

जागतिक संघटनांमध्ये आणि राजकारणात आलेली स्थितिशीलता कमी करण्याच्या उद्देशाने दशकभरापूर्वी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी एकत्र येऊन ब्रिक्‍स संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या सदस्य देशांनी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रशांनावर एकजूटपणे भूमिका मांडली पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची पुनर्रचना हा महत्त्वाचा विषय असून त्याबाबत विलंब लावून चालणार नाही. या प्रश्नावर ब्रिक्‍स देशांत दुफळी असता कामा नये, असे स्वराज यांनी म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानला अप्रत्यक्ष कानपिचक्‍या
कोरियन द्वीपकल्पातील प्रश्नावर तोडगा काढताना अण्वस्त्रप्रसाराबाबत भारताच्या चिंतांचाही विचार केला पाहिजे, असेही स्वराज यांनी सांगितले. अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी पाकिस्तानला उत्तर कोरियाकडून मदत मिळाली होती. ब्रिक्‍स परिषदेच्या माध्यमातून स्वराज यांनी त्याकडे पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता लक्ष वेधले.

कोरियातील प्रश्न सोडवताना त्याचा भारताच्या शेजारी देशांमध्ये अण्वस्त्रप्रसार होण्याशी संबंध आहे हेही जगाने लक्षात घेतले पाहिजे, असे स्वराज म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)