सुभाषचंद्र बोस यांचे विचार अवगत करा

आमदार सुरेश गोरे : राजगुरूनगरात जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

राजगुरूनगर- देशाच्या स्वातंत्र्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोठे होते. त्यांचे विचार अवगत केले पाहिजेत, असे आवाहन आमदार सुरेश गोरे यांनी राजगुरूनगर येथे व्यक्त केले.
राजगुरूनगर येथे जागर पथारी संघटनेच्यावतीने सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने राजगुरूनगर येथील हुतात्मा स्मृतीस्मारकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी गोरे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राज्य जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, जिल्हा परिषद अतुल देशमुख, माजी सदस्य मंगलदास बांदल, बाबा राक्षे, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे संचालक राहुल तांबे, शिवव्याख्याते प्रा. गुलाब वळसेपाटील, जिल्हा शिवसेना महिला संघटक विजया शिंदे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, महिला तालुका प्रमुख नंदा कड, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, अमोल पवार, सतीश राक्षे, पथारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दुगड, डॉ. प्रमोद कुबडे, हिरामण सातकर, उर्मिला सांडभोर, दिलीप तापकीर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना पथारी संघटनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)