सुब्रमण्यम स्वामींच्या ‘या’ ट्विटमुळे मालदीव भडकले

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या एका ट्विटवरून भारतापासून ते मालदीवपर्यंत खळबळ माजली आहे. स्वामींनी मालदीववर केलेल्या ट्विटवर मालदीव सरकारने आक्षेप घेत भारतीय उच्चायुक्त अखिलेश मिश्रा यांच्याकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

मालदीवमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुब्रमण्यम स्वामींनी २४ ऑगस्ट रोजी एक वादग्रस्त ट्विट केले होते. त्यांनी म्हंटले होते की, ‘जर मालदीवमध्ये निवडणुकी दरम्यान कोणतीही गडबड झाली तर भारताने तुमच्यावर हल्ला करायला पाहिजे.’ या ट्विटनंतर केवळ मालदीव सरकारच नाही तर तेथील स्थानिक नागरिकही चांगलेच संतापले. मालदीव सरकारने या ट्विटची तक्रार भारत सरकारकडे केली. परंतु केंद्र सरकारने कोणतीही टिपण्णी न करता म्हणाले की, ‘स्वामी यांचे मत त्यांचे वैयक्तिक मत आहे. ते भारत सरकारचे मत नाही’ असे उत्तर दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वामींच्या या ट्विटवर मालदीवचे नागरिकही तिखट प्रतिक्रिया देत असून ते म्हणत आहे  की, तुम्ही तुमच्या देशातील समस्या सोडवा. आम्ही आमच्यावर कोणालाही हल्ला करण्याची संधी देणार नाही. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि लहान-मोठ्याआकाराने काही फरक पडत नाही, असेही एकाने ट्विट केले आहे.

या ट्विटला उत्तर देताना सुब्रमण्यम स्वामींनी म्हंटले की, १९८८ मध्ये आम्ही आमचे सैन्य पाठवून तुम्हाला तामिळ आतंकवादपासून वाचवले होते. स्वामींच्या या ट्विटवर अनेक उलट प्रतिक्रिया येत आहेत.

https://twitter.com/Swamy39/status/1032969849452941312

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)