सुप्यात मुस्लीम बांधवांचा आंदोलनास पाठिंबा

सुपा  – पारनेर तालुक्‍यातील सुपा येथे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सुमारे 10 ते 12 गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुप्यात व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेऊन आंदोलनाला पाठींबा दिला. येथ मुस्लीम बांधवांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.
सकाळी 9 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढून व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीनेदेखील आवाहन करण्यात आले. त्यास सर्व व्यावसायिकांनी पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली. शहरातून रॅली काढल्यानंतर सुपा पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलने केली जात असताना लोकप्रतिनिधी गप्प का? असा सवाल उपस्थित करून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक बी. जे. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या दरम्यान सुप्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, दिलीप पवार, मनोज बाफना, योगेश रोकडे, दिगंबर पवार, सोमनाथ नांगरे, वैभव काळे, अमोल पवार, अक्षय थोरात, अमोल मोकाते, विलास पवार, प्रवीण पवार, सचिन वाढवणे, रियाज शेख, फय्याज शेख, रमिज शेख, हानिफ शेख, अमिभाई शेख यांच्यासह मुस्लीम बांधव व सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)