सुनील शेट्टीचे ‘या’ चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण… 

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी अ.ब.क या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या मराठीत पदार्पणाने मराठी रसिकांना त्याचा डॅशिंग लुक रसिक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘अ.ब.क’ या चित्रपटात सुनील शेट्टीने ‘बाप्पा’ हि व्यक्तिरेखा साकारली असून सुनील शेट्टीचे सध्या ‘बाप्पा बाप्पा’ हे गाणे सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. सुनील शेट्टीचा या चित्रपटातील आगळावेगळा रोल रसिकांना नक्कीच आवडेल. या चित्रपट तो मराठीत बोलला असून त्याचे चित्रपटातील संवाद मराठी आहेत. सुनील शेट्टी याबाबत म्हणाले, ‘मी महाराष्ट्रीयन आहे. आमचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रात राहते. मराठी सण, मराठी अस्मिता त्याचबरोबर मराठी खाद्यपदार्थ मला खूप आवडतात.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व वेंकीज प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित ‘अ ब क’ या मराठी चित्रपटाचे लेखक आबा  गायकवाड असून संगीतकार बापी – टूटूल व साजिद वाजीद हे आहेत. तर कॅमेरामन महेश अने हे आहेत. या चित्रपटात साहिल जोशी, मैथिली पटवर्धन, सनी पवार, आर्या घारे, विजय पाटकर, सतीश पुळेकर, किशोर कदम आदि कलाकार या चित्रपटात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)