सुनिल शेट्टी आणि अजय देवगणच्या सिनेमांचा लिलाव

बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची सक्तीने वसुली करण्याची उपाय योजना आता सिनेमाच्या थिएटरपर्यंत येऊन पोहोचली आहे. सलमानचा “बागी’ बनवणाऱ्या दीपक शिवदासनीच्या तीन सिनेमांच्या निगेटिव्ह आणि शुटिंगसाठी वापरण्यात आलेली सर्व सामुग्री आता लिलाव केली जाणार आहे. या संदर्भात बॅंकेने निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.

दीपक शिवदासनी आणि त्यांच्या मित्रांनी सुनिल शेट्टी, सोनाली बेंद्रे आणि पूजा बत्राच्या “भाई’, अजय देवगण, माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटाला घेऊन “ये रास्ते है प्यार के’ आणि लक्ष्मी, रवि किशन आणि रति अग्निहोत्रीला घेऊन “ज्युली 2′ हे सिनेमे बनवले होते. त्यासाठी बॅंकेकडून मोठी रक्कम क्रेडिटवर घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता बॅंकांना आपल्या पैशांची वसुली करण्यासाठी या सिनेमांवरचे अधिकार देण्यात आले आहेत. बॅंकेने या सिनेमाचा लिलाव करून आपल्या कर्जाची वसुली करायचे ठरवले आहे. दीपक शिवदासनीच्या “ज्युली 2’च्या शुटिंगच्यावेळी खूप वाद झाला होता. “ज्युली 2′ साठी सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी हे निर्मात्यांपैकी एक होते. त्यामुळे बॅंकेने त्यांनाही नोटीस बजावली आहे. एकूण काय तयार झालेल्या तीन सिनेमांचा लिलाव आता होणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)