सुनावणी योग्य प्रकारे न झाल्यास कठुवा प्रकरण राज्याबाहेरील न्यायालयात…

नवी दिल्ली – कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची योग्य प्रकारे सुनावणी हा एक मोठाच चिंतेचा विषय आहे, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने सांगिैतले की, सुनावणी योग्य प्रकारे होत नसल्याची शंका आली तरी प्रकरण सुनावणीसठी राज्याबाहेर नेण्यात येईल.

खटल्याची निष्पक्षपाती सुनावणी होण्याबरोबरच पीडितेच्या कुटुंबीयांना, त्याचप्रमाणे आरोपींना योग्य कायदेशीर मदत मिळते हे पाहणे; तसेच त्यांना व त्यांचे वकील यांना योग्य संरक्षण मिळण्याची खात्री करणे हे आपले घटनात्मक कर्तव्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

कठुआ प्रकरणात जम्मू-काश्‍मीरच्या गुन्हे शाखेतील पोलीसांना कामात अडथळा आणल्याचा आरोप बीसीआय (बार कौन्सिल ऑफ इंडिया) वर करण्यात आला होता. परंतु तपास करणाऱ्या पोलीसांना वा पीडितेच्या कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना धमकावलेले नाही, असे बीसीआयने स्पष्ट केले आहे. जर बीसीआयच्या वकिलांची बाजू चुकीची असल्याचे आढळून आले तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे खंडपीठाने म्हटले आहे. प्रसार माध्यमांनी या प्रकरणाची योग्य प्रकारे हाताळणी केली नाही, अहवालांचा चुकीचा अर्थ काढला असे बीसीआयच्या वकिलांनी म्हटले आहे. पीडितेच्या वडिलांच्या वकिलाने हे प्रकरण कठुआमधून चंदीगडमध्ये न्यावे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाची देखरेख असावी अशी मागणी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)