सुधीर कर्नाटकीला हायकार्टाचा दिलासा

जितेंद्र जगताप आत्महत्याप्रकरण : तीस हजारांचा जामीन मंजूर
मुंबई – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावणाऱ्या उच्च न्यायालयाने मात्र या प्रकरणातील आरोपी सुधीर कर्नाटकीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना तपास अधिकारी ज्यावेळी बोलावतील त्यावेळी हजर राहत तपास कामात मदत करण्याची अट घातली.

सामाजिक कार्यकर्ते जितेद्र जगताप यांनी आत्महत्या करताना पाच जणांना जबाबदार धरले. तशी चिठ्ठीही लिहिली. याची दखल घेऊन पोलिसांनी मानकर, विकासक सुधीर कर्नाटकी यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल करत अटक सत्र सुरू केले. त्यानंतर कर्नाटकी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्या समारे सुनावणी झाली. यावेळी कर्नाटकी यांच्या वतीने ऍड. मनोज मोहिते, ऍड. शंतनू फणसे आणि ऍड. पार्थ शहा यांनी बाजू मांडताना कर्नाटकी हे केवळ त्या भुखंडाचा विकास करणार होते. या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. जगताप याला धमकावण्यात आले त्या बैठकीशी अथवा त्यांच्या व्यवहारात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कोणताही सहभाग नव्हता, असा दावा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिडीतांच्या वतीने ऍड. एस. पी. जोशी यांनी त्याला जोरदार विरोध केला. ज्या भुखंडाच्या व्यवहारामुळे जितेद्र याला आत्महत्या करण्याची वेळी आली, तो भुखंड कर्नाटकी विकसीत करणार असल्याने या आत्महत्येला कर्नाटकीही जबाबदार असल्याने जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. उभय पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने कर्नाटकी याला 30 हजारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)