सुट्यांमध्ये आता पालकांसाठीही “असाईनमेंट’

चेन्नईच्या शाळेतील मुख्याध्यापकांचे सोशल मिडियावर व्हायरल
सर्वच पालकांना असाईनमेंट देण्याची गरज
पुणे- परीक्षेनंतरच्या कालावधीनंतर येणाऱ्या दीर्घ सुट्यांमध्ये पालकांनी मुलांसोबत कसे वागावे यासाठी चक्‍क चेन्नईतील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक पालकांना असाईनमेंट म्हणजे थोडक्‍यात मे महिन्याच्या सुटीत करायचा अभ्यासच दिला आहे. मात्र त्या मुख्याध्यापिकेने दिलेला अभ्यास आता प्रत्येक पालकाने करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसते आहे.

चेन्नई येथील अनाई वाइलेट मॅट्रीक स्कूलच्या मुख्याध्यापिका लायदिया देवासागम यांनी 19 एप्रिल रोजी सर्व पालकांसाठी पत्र काढत सर्व पालकांनी सुटीत नेमके काय कावे याची यादी दिली आहे. गेल्या अठवडाभरापासून हे पत्र राज्यातील अनेक पालकांच्या ग्रुपवर किंवा अन्य शिक्षणविषयक ग्रुपवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या पत्रात लायदिया यांनी म्हटले आहे की, दहा महिन्यांनंतर आता पुढील दोन महिने तुमची मुले ही पुर्णवेळ तुमच्याबरोबर रहाणार आहेत. त्यामुळेच दिवसातून किमान दोन वेळचे जेवण हे आपल्या मुलांबरोबर घ्या. अन्नासाठी शेतकरी घेत असलेले कष्ट त्यांना सांगा व त्यांना अन्न ताटात टाकण्यापासून परावृत्त करा. प्रत्येक जेवणानंतर त्यांना श्रमाचे मोल कळावे यासाठी त्यांना स्वत:चे ताट स्वत: स्वच्छ करु द्या, त्यांना स्वयंपाकातही मदतीला घ्या. दिवसातून त्यांना किमान पाच नविन इंग्रजी शब्द शिकवा. त्यांना किमान तीन शेजाऱ्यांशी भेट घडवा. त्यांचे आजीआजोबा नातेवाईक यांच्याकडे त्यांना या दिवसांमध्ये घेऊन जा, जेणेकरुन त्यांना नात्यांचा ओलावा कळेल.

तसेच त्यांना झाडे लावायला शिकवा, त्यांना रोज झाडांची निगा राखू द्या. त्यांना भाजीपाला, फळे आणण्यासाठी बाजारात घेऊन जा. त्यांना तुमच्या काही कौंटुबिक इतिहासाची माहिती द्या. त्यांचे कपडे मळले तरीही चालतील पण त्यांना बाहेर खेळू द्या. शक्‍यतो मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम्सपासून दूर ठेवा. त्यांना गोष्टीची पुस्तके आणून द्या. अशा सूचना या मुख्याध्यापकांनी दिल्या आहेत. अनेक पालकांना या सूचना पटल्यामुळे त्यांनी सर्व शाळांतील पालकांनी ही असाईनमेंट करावी असा सल्लाही एकमेकांना दिला आहे. पालकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देणाऱ्या या मुख्याध्यापिकेच्या पत्राची सध्या सोशल मिडियावर या पत्राची जोरदार चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)