सुट्टी लावा “अर्थकारणी’

अंजली महाजन

उन्हाळी सुट्ट्या या मुलांसाठी धिंगाणामस्तीचा काळ असतो, तर पालकांसाठी हा काळ मुलांचे पुढील शिक्षण, ऍक्‍टिव्हिटी याचा विचार करण्याचा असतो. मात्र बऱ्याच युवक-युवतींना या सुट्ट्या कंटाळवाण्या वाटतात. अशा स्थितीत केवळ मौजमजा, फिरण्यात वेळ घालण्याऐवजी एक-दीड महिन्यासाठी शॉर्ट टर्म आंत्रप्रेन्युअर होऊ शकतो. या काळातील आंत्रप्रेन्युअरशिपसाठी अधिक तयारीची गरज लागत नाही. उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, हस्ताक्षर वर्ग, पोहोण्याचे प्रशिक्षण, संगीत, नाट्य, कला प्रशिक्षण, हस्तकला प्रशिक्षण या माध्यमातून आपण कमी कालावधीसाठी रोजगाराची संधी निर्माण करू शकतो आणि आपल्या कौशल्याची देखील मशागत करू शकतो. तुम्ही गिर्यारोहक असाल तर मुलांना त्याचे प्रशिक्षण देण्याचा हा उत्तम कालावधी आहे.

उन्हाळी वर्ग : आपण काही मित्रांना एकत्र करून सोसायटी, कॉलनीमध्ये एक समर कॅम्प सुरू करु शकता. या उन्हाळी वर्गातील प्रवेशासाठी आपण विविध माध्यमांतून प्रचार, प्रसार करू शकता. मुलांना आकर्षित करणारे उपक्रम या माध्यमातून राबवण्याची दक्षता घ्यायला हवी. मुलांना आणि त्यांच्या पालकांना समर कॅम्पचे वैशिष्ट्ये सांगावे आणि त्याचे भविष्यातील महत्त्व देखील पटवून द्यावे. भित्तीपत्रके, सोसायटीतील मासिक बैठक, व्हॉटसअप ग्रुप, स्थानिक वृत्तपत्रांमधील जाहिरात या माध्यमांचा वापर करून उन्हाळी वर्गाची माहिती संबंधितांपर्यंत पोचवावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हस्तकला वर्ग : आपल्याकडे आर्ट हस्तकलेचे कौशल्य असेल तर सोसायटी, कॉलनीतील मुलांना शिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. काही मंडळी कायमस्वरूपी हस्तकलेचा क्‍लास देखील लावू शकतात.

कौशल्यांना वाव द्या- आपल्याकडे कौशल्य असेल तर त्यातून उन्हाळी सुट्टीत पैसा कमवू शकता. नृत्यकला, संगीत कला, गायन कला, स्केचिंग, पेटिंग, परकीय भाषा शिक्षण यासारख्या कौशल्यातून कमाईचे साधन निर्माण करू शकता. कौशल्य प्रशिक्षण शिबिर हे अल्प काळासाठी का होईना रोजगाराचे साधन बनते आणि आपलाही सराव राहतो.

पार्टी प्लॅनर व्हा : अनेक विद्यार्थी उन्हाळी सुट्टीत गावी जातात. वर्षभर हॉस्टेलमध्ये राहिल्याने गावाकडचे मित्र दुरावलेले असतात. घरी परतल्यावर पार्टीचे आयोजन करून तुम्ही जुन्या मैत्रीला उजाळा देऊ शकता. तसेच इव्हेंट मॅनेजर म्हणून आपण उन्हाळी सुट्टीत काही उपक्रम हाती घेऊ शकता. पार्टी आयोजन करण्याबराबेरच सहभागी होण्याचाही आनंद सहजपणे घेऊ शकता.

बेबी सिटर व्हा : सुट्यांच्या काळात पैसा कमावण्याचे आणखी एक साधन म्हणजे बेबी सिटिंग. नोकरदार महिलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांना घरात एकटे कसे ठेवावे, याची सतत चिंता असते. अशा स्थितीत आपण बेबी सिटर होऊन नोकरदार महिलांची चिंता मिटवू शकता आणि रोजगारही मिळवू शकता. बेबी सिटरच्या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते.

उन्हाळी सुट्टीत काम करताना यावसायिकता बाळगणे आवश्‍यक असते; जेणेकरून आपल्याला अनुभव आणि ओळख निर्माण होईल. शिबिराचे शुल्क आकारताना पालकांना बोजा पडणार नाही आणि आपल्यालाही अगदीच कमी पैसे मिळणार नाहीत याची काळजी घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)