‘सुई धागा’ स्पेशल स्क्रिनींगच्या वेळी चर्चा ‘विरूष्का’ची

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरूण धवन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘सुई धागा’ हा आज भारत भर प्रदर्शित झाला. परंतु, काल गुरुवारी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींग ठेवण्यात आले. त्याला अनेकस्टार मंडळींनी हजेरी लावली. यामध्ये आकर्षणाचा केंद्राबिंदू ठरली ती ‘विरूष्का’ जोडी.
भारतीय राष्टीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट पत्नी अनुष्काच्या चित्रपटाच्या स्क्रिनींगला अनुष्कासोबत दाखल झाला. त्यावेळी अनुष्काने रेड ड्रेस घातला होता. तर विराटने ब्लॅक टी-शर्ट परिधान केला होता. ‘विरूष्का’ जोडी यावेळी खूप खेळीमेळीच्या वातावरणात दिसत होती. अनुष्काच्या चेहऱ्यावर सतत हास्य होते. विराटला सध्या चालू असलेल्या आशिया चषकासाठी विश्रांती दिलेली आहे.
या जोडी शिवाय अनेक स्टार मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यात भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटके, वरून धवन आणि त्याची मैत्रीण नताशा दलाल, आदित्य रॉय कपूर, शबाना आजमी, नेहा धुपिया, मनीष पॉल या अश्या अनेक कलाकारांनी स्पेशल स्क्रिनींगला उपस्थिती दर्शविली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)