सीरिया युद्‌धात मारली गेली 7,000 मुले: राष्ट्रसंघचा अहवाल 

संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क: सीरिया युद्धात 7,000 पेक्षा अधिक मुले मारली गेली असल्याची धक्कदायक माहिती राष्ट्रसंघाने दिली आहे. राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे, की गेल्या सात वर्षातील सीरियन युद्धात 7,000 ह्जारापेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत. मात्र अनधिकृत आकडेवारीनुसार ही संख्या 20,000 पेक्षाही अधिक आहे. “मुले आणि सशस्त्र संघर्ष’ महासचिवांच्या विशेष प्रतिनिधी व्हर्जिनिया गाबा यांनी सुरक्षा परिषदेत ही माहिती दिली आहे. या कालावधीत जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या मुलांची कथा अतिशय दु:खद असल्याचे त्यांनी संगितले,
हे वर्ष सीरियन बालकांसाठी अत्यंत वाईट असल्याचे आणि या काऴात मुलांवरील हिंसाचारात वाढ झाल्याचीही महिती त्यांनी दिली आहे. अशा प्रकारच्या 1200 घटनांची त्यांनी माहिती दिली. घरे, समुदाय, शाळा, शरणार्थी शिबिरे. सर्वच ठिकाणी मुलांना संकटांचा-जुलुमांना सामोरे जावे लागले आहे. आणि मुले गंभीर मानसिक संकटांशी झुंज देत आहेत.
या लोकांना शांती हा शब्दच माहीत नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रसंघाने सांगितले की सन 2014 नंतर मारल्या गेलेल्यांची आकडेवारी काढणे बंद केले आहे. सीरियाकडून मिळालेल्या आकडेवारीवर विश्‍वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती. राष्ट्रसंघाने सीरियन युद्धात 4 लाख लोक मारले गेल्याची माहिती दिली, परंतु या आकडेवारीसाठी अविश्‍वसनीय पर्यवेक्षक समूहांवर अवलंबून राहावे लागत होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)