सीरियामध्ये रासायनिक अस्त्रांच्या वापराची संयुक्‍त राष्ट्राला भीती

जिनिव्हा – सीरियातील इडलिब प्रांतामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात अंतिम निर्णायक युद्धाची शक्‍यता निर्माण झाली आहे. या अखेरच्या टप्प्यातील युद्धादरम्यान रासायनिक अस्त्रांचा वापर होण्याची शक्‍यता संयुक्‍त राष्ट्राने व्यक्‍त केली आहे. क्‍लोरिनच्या वापरामुळे दहशतवाद्यांबरोबरच लक्षावधी नागरिकांचाही मोठा विनाशकारी संहार होण्याची भीती संयुक्‍त राष्ट्राने व्यक्‍त केली आहे.

इडलिबमध्ये इसिसचे विदेशी दहशतवादी मोठ्या संख्येत आहेत. सुमारे 10 हजार दहशतवादी या भागात आहेत. मात्र तेथील नागरिकांना सुखरूपपणे बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला जायला हवा, अशी अपेक्षा संयुक्‍त राष्ट्राचे सीरियासाठीचे दूत स्टॅफन डी मित्सुरा यांनी व्यक्‍त केली आहे. याशिवाय सीरियामध्ये रासायनिक अस्त्रांचा वापर टाळला जायला हवा, असे आवाहन संयुक्‍त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्तानियो ग्युटरेझ यांनीही केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोठ्या लष्करी कारवाईदरम्यान विनाशकारी नरसंहार होण्याबाबतचा इशाराही ग्युटरेझ यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत रासायनिक अस्त्रांचा वापर होणे मान्य असणार नाही. तसेच इडलिब प्रांतातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आघाडीच्या फौजा आणि सीरियातील सरकारांनी उपाय योजना कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र रशियाच्या नेतृत्वाखालील सीरियाच्या फौजांनी आपल्याकडे रासायनिक अस्त्रे नसल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)