सीरियल रेपिस्टच्या मुसक्‍या आवळल्या

आतापर्यंत 11 तरुणींची तक्रार : नवी मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई – ठाणे, पालघर, नवी मुंबईत 15 हून अधिक तरुणींवर बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रेहान कुरेशी असे या 34 वर्षीय नराधमाचे नाव आहे. नवी मुंबई, पालघर, ठाण्यासह 13 ठिकाणी कुरेशीवर बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

रेहान कुरेशी हा नराधम एका खासगी कंपनीत सेल्समनचे काम करायचा. काल सीसीटीव्ही फुटेजमध्ये नराधम दिसला होता. त्यानंतर त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. अखेर आज पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली.
नालासोपाऱ्यात 15 हून अधिक तरुणींवर या सिरीयल रेपिस्टने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आतापर्यंत त्याच्या विरोधात 11 तरुणींनी तक्रार दिली आहे. अजूनही भीतीपोटी अनेक तरुणींनी तक्रार दिली नसल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्याने केलेल्या बलात्कारांची संख्या मोठी असण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेहान कुरेशी हा 9-14 वर्षे वयोगटातील लहान मुलींवर पाळत ठेवायचा. त्यानंतर घराचा अंदाज घेऊन दार ठोठावायचा. एखाद्या लहान मुलीने दरवाजा उघडला, की तो भावनिक जाळे फेकायचा. “तुझ्या वडिलांनी तुला बोलावले आहे’ हे सभ्यपणे कारणासहित पटवून देण्यात हा माहीर होता. लहान मुलींना एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करायचा.

त्यामुळे ठाणे, पालघर, नवी मुंबईतील नागरिक दहशतीखाली होते. अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट वसई, विरारमध्ये दाखल झाल्याची माहिती कळताच, इथले नागरिक हातात काठी घेऊन स्वतः पहारा देऊ लागले. आळीपाळीने टीम करून ही मंडळी आपापल्य परिसरात पहारा देत होती. अनोळखी दिसणाऱ्या व्यक्तीची चौकशीही करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)