“सीबीएसई’ परीक्षेतही मुलीच हुश्‍शार!

इयत्ता दहावीचा निकाल 86.70 टक्‍के : चौघांना मिळाले 499 गुण
– पुण्यातील बहुतांश शाळा 100 टक्‍के पास
– गुडगाव येथील प्रखर मित्तल देशात पहिला

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.29 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास जाहीर झाला. यामध्ये पहिल्या आलेल्या चौघांना 499 गुण मिळाले असून प्रखर मित्तल गुडगाव येथील विद्यार्थी देशात पहिला आल्याचे मंडळाने सांगितले आहे. विशेष म्हणजे, बारावीप्रमाणेच इयत्ता दहावीतही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय मंडळाने सोमवारी जाहीर केल्याप्रमाणे दहावीचा निकाल संकेतस्थळावर दुपारी चारच्या सुमारास लागणार होता. मात्र, दुपारी दोनच्या दरम्यान मंडळाने हा निकाल जाहीर केला. यात पुण्यातील बहुतांशी शाळांचे निकाल हे शंभर टक्‍के लागले आहेत. या परीक्षेला देशभरातून 16 लाख 24 हजार 682 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 लाख 8 हजार 594 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णांची टक्‍केवारी 86.70 टक्‍के आहे. बोर्डाकडून ही परीक्षा 5 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. महाराष्ट्र राज्य ज्या विभागांतर्गत येते त्या चेन्नई विभागाचा निकाल 97.37 टक्‍के लागला असून पहिल्या क्रमांकावर तिरुअनंतपुरम्‌ आहे. या परीक्षेत 3 हजार 760 दिव्यांग विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 3 हजार 480 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल 92.55 टक्‍के आहे. त्यामध्ये अनुष्का पांडा ही विद्यार्थिनी 489 गुण मिळवत प्रथम आली आहे. त्याबरोर सनया गांधी, सौम्या प्रधान या विद्यार्थिनी अनुक्रमे 489 व 484 गुण मिळवत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. देशातील विद्यार्थ्यांसह 23 हजार 787 परदेशी विद्यार्थ्यांनीही ही परीक्षा दिली होती, त्यांचा निकाल एकूण 98.32 टक्‍के लागला आहे.

उत्तीर्ण मुली 88.67 टक्‍के
उत्तीर्ण मुले 85.32 टक्‍के

शाळांच्या प्रकारनुसार उत्तीर्णतेची टक्‍केवारी
सरकारी शाळा -63.97
सरकारी अनुदानित शाळा- 73.46
स्वयंअर्थसहाय्यित शाळा -89.49
जवहार नवोदय विद्यालय -97.31
केंद्रीय विद्यालय -95.96
केंद्रीय तिबेटीयन स्कूल- 86.43

90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळणारे विद्यार्थी – 1 लाख 31 हजार 493
95 टक्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – 27 हजार 496 विद्यार्थी

बोर्डात पहिले आलेले विद्यार्थी
विद्यार्थ्याचे नाव गुण
प्रखर मित्तल 499
रिमझिम अगरवाल 499
नंदिनी गर्ग 499
श्रीलक्ष्मी जी 499

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)