सीबीएसई; दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई)10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका अधिका-याने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे 10वी आणि 12वीचे पेपर फुटले होते. त्यामुळे त्या पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील 10वीच्या मुलांना दिलासा देण्यात आला होता. 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)