नवी दिल्ली – कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीवरून रविवारी स्थानिक पोलीस आणि सीबीआयच्या पथकामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र यासंबंधी सीबीआयने पुरावे सादर करावेत. त्यानंतर उद्या यासंदर्भात सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
SC to hear tomorrow CBI plea seeking directions to Kolkata Police Commissioner Rajeev Kumar to cooperate with the investigation in Saradha chit fund case. pic.twitter.com/ZvygRQbT6K
— ANI (@ANI) February 4, 2019
सीबीआयने रोझ व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळ्यांवरून कुमार यांना समन्स बजावले आहे. मात्र, राजीव कुमार हे सीबीआयला सहकार्य करीत नाहीत. त्यांना सहकार्याबाबत निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी सीबीआयने याचिकेत केली आहे. तसेच चिडफंड घोटाळ्यातील पुरावे त्यांनी नष्ट केल्याचा आरोप सीबीआयने याचिकेत केला आहे.