सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग

मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18वर सोलापूर एक्सप्रेसच्या रिकामी डब्याला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या उभ्या असलेल्या यार्डात सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्यानं फलाटावरील प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीमुळे एकाच बोगीचे नुकसान झाले. या आगीबाबत सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यार्डसारख्या भागात प्रत्येक ठिकाणी सुरक्षा पुरवणे शक्य नाही तरी देखील अग्निशमन दलाने चांगली कामगिरी करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)