सीएनजी, वीज, खते महागण्याची चिन्हे

नैसर्गिक वायूच्या दरात 10 टक्के वाढ
नवी दिल्ली – केंद्र सरकारने शुक्रवारी देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या दरात 10 टक्के वाढ जाहीर केली. त्यामुळे सीएनजी, वीज आणि खते महागण्याची चिन्हे आहेत.

सरकारच्या निर्णयामुळे देशांतर्गत नैसर्गिक वायूचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 1 ऑक्‍टोबरपासून अधिक किंमत मिळेल. त्यामुळे ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी), रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. मात्र, नैसर्गिक वायूच्या वापरावरील खर्चात वाढ झाल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या सीएनजी, वीज आणि खतांच्या उत्पादनावरील खर्चही वाढेल. त्यामुळे त्यांची भाववाढ होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यमान सरकारने ऑक्‍टोबर 2014 मध्ये गॅस दराबाबत नवा फॉर्म्युला निश्‍चित केला. त्यानुसार दर सहा महिन्यांनी गॅसदराचा आढावा घेतला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)