सीआरपीएफच्या स्थापना दिनानिमित्त 11 हजार वृक्षारोपण

तळेगाव दाभाडे – महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्षारोपण योजनेच्या अंतर्गत, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 79 व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधुन ग्रुप केंद्र, तळेगाव दाभाडे येथे तहसीलदार मावळ व महसूल विभाग यांच्या वतीने सुमारे अकरा हजार झाडे उपलब्ध करून देण्यात आली.

मावळ तालुका खान व क्रशर उद्योजक संघ, रोटरी क्‍लब तसेच रोट्रॅक्‍ट क्‍लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या सौजन्याने सीताफळ, आवळा, खैर आदी फळझाडे व पर्यावरणाला पूरक व उपयुक्त अन्य वृक्षांची लागवड करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीआरपीएफचे पोलीस उप महानिरीक्षक अरुनेंद्र प्रताप, मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष व रोटरी सिटीचे संस्थापक विलासराव काळोखे, अध्यक्ष नितीन शहा, सचिव संतोष शेळके, प्रशिक्षक दिलीप पारेख, संजय मेहता, सुरेश दाभाडे, बाळासाहेब रिकामे, राजू कडलक, विकास कदम, प्रदीप टेकवडे, विनय दाभाडे, सौरभ मेहता, बाळासाहेब भेगडे, तानाजी मराठे, माधुरी शहा, शालिनी खळदे, शाईन शेख, रेश्‍मा फडतरे, शरयु देवळे, प्रतिभा मेहता, वैशाली खळदे, रोट्रॅक्‍ट क्‍लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील, डॉ. पलक छाजेड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)