सीआरपीएफच्या दोन जवानांना मरणोत्तर किर्ती चक्र

नवी दिल्ली – कॉन्स्टेबल प्रदीपकुमार पांडा आणि राजेंद्रकुमार नैन या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शहीद जवानांना मरणोत्तर किर्ती चक्र सन्मान जाहीर झाला आहे. किर्ती चक्र हे शांतता काळातील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शौर्यपदक आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांशी संघर्ष करताना अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. काश्‍मीरच्या अवंतीपोरामध्ये असणाऱ्या सीआरपीएफच्या छावणीवर दहशतवाद्यांनी 30 डिसेंबर 2017 यादिवशी हल्ला केला. त्यावेळी सीआरपीएफ जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक 36 तासांहून अधिक काळ चालली. जवानांनी 3 दहशतवाद्यांचा खातमा करताना त्यांचा आत्मघाती हल्ला उधळून लावला. त्या चकमकीत पांडा आणि नैन यांच्यासह 5 जवान शहीद झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पांडा आणि नैन यांच्या कामगिरीचा आता किर्ती चक्रने सन्मान करण्यात आला आहे. त्यावेळी अवंतीपोरामध्ये दहशतवाद्यांशी झुंजणाऱ्या सीआरपीएफच्या पथकाचे नेतृत्व करणारे कमांडर असिस्टंट कमांडंट झिले सिंह यांना तिसऱ्या क्रमांकाच्या शौर्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी किर्ती आणि शौर्य चक्र सन्मानांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, सीआरपीएफला यंदा 44 पोलीस शौर्य पदके जाहीर झाली आहेत. त्याबाबत सीआरपीएफने इतर केंद्रीय पोलीस आणि निमलष्करी दलांना मागे टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)