सीआरआर कमी करण्याची गरज ; अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांची रिझर्व्ह बॅंकेला सूचना 

नवी दिल्ली: भांडवल असुलभतेमुळे शेअरबाजार आणि कंपन्यांना ग्रासले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भांडवल सुलभता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बॅक गुरुवारी 10 हजार कोटी रुपयांचे रोखे खुल्या बाजारातून विकत घेणार आहे. त्याचबरोबर बॅंकेने आगामी पतधोरणवेळी सीआरआर म्हणजे रोख राखीव प्रमाण कमी करण्याच्या शक्‍यतेवर विचार करावा, असे अर्थमंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी सुचविले आहे.
व्यावसायिक बॅंकांना त्यांच्याकडील ठेवीपैकी काही रक्‍कम रिझर्व्ह बॅंकेकडे रोख स्वरूपात जमा करावी लागते. त्याला सीआरआर असे म्हणतात. सध्या सीआरआर 4 टक्‍के आहे. तो जर काही प्रमाणात कमी केला तर बाजारात वेगाने भांडवल सुलभता निर्माण होण्यास मदत होणार आहे. तेवढा पैसा बॅंका लगेच वापरात काढू शकणार आहेत. सप्टेंबर 2013 पासून रिझर्व्ह बॅंकेने सीआरआर 4 टक्‍के या पातळीवर कायम ठेवला आहे.
दरम्यान, बिगर बॅंकिंग वित्त संस्थांना कर्जपुरवठा करण्यात कसलेही अडथळे नाहीत. त्यासाठी बॅंकांकडे मुबलक निधी असल्याचे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही एनबीएफसीला भांडवल सुलभतेची अडचण असल्याचे दिसत नाही. मात्र बॅंकेने सीआरआरबाबत कसलेही वक्‍तव्य केलेले नाही. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत या विषयावर विचार केला जाण्याची शक्‍यता आहे. जर बाजारात भांडवल उपलब्धतता जास्त असे तर महागाई वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे बॅंकेला सर्व बाजूनी विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे बॅंकेच्या निर्णयाकडे अनेकांचे
लक्ष आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)