सिव्हीलमध्ये टॉमी फ्लुच्या 7000 गोळ्या

सातारा ः पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. प्रदीप आवटे शेजारी उपस्थित मान्यवर.

डॉ. प्रदिप आवटे : खाजगी औषध दुकानदारांना साठ्याचे अवाहन
सातारा दि. 28 (प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. जिल्हा रुग्णालयाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.सिव्हील हॉस्पिटल मध्ये टॉमी फ्लुच्या 7000 गोळ्या तर 1000 सिरप उपलब्ध असल्याचे एकात्मिक रोग सवेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे यांनी सांगितले. ते जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लु संदर्भात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. नागरिकांच्या सोयीसाठी खाजगी औषध दुकानदारांनी किमान 5 दिवसांसाठीचा औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आवटे यांनी केले.
यावेळी एकात्मिक रोग सवेक्षण कार्यक्रमाचे डॉ. रमेश निगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक उज्वला माने आदि उपस्थित होते.
डॉ. आवटे म्हणाले की, घसा दुखणे, खोकला व त्यासोबत सतत दोन दिवस 100 फॅरेनाईट पेक्षा जास्त ताप श्वास घेताना त्रास होणे किंवा दम लागणे. क्वचित प्रसंगी उलटी व अतिसार अशी लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. स्वाईन फ्लू लागण न होण्यासाठी संशयित किंवा बाधित रुग्णांपासून किमान 6 फुट दूर रहावे. सिनेमागृह, नाट्यगृह, बंदिस्त वातानुकुलीत मॉल्स इत्यादी बंदिस्त व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. हात सातत्याने साबण व स्वच्छ पाण्याने धुवावेत. खोकतांना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.
वेळेत उपचाराने हा आजार निश्‍चितपणे बरा होऊ शकतो. टॅमी-ल्यू हे प्रभावी औषध आहे. याचा पुरेसा साठा जिल्हा रुग्णालयात आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये यावर मोफत उपचार केले जातात, असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)