सिरीयावरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली

इस्तंबुल : सिरीयाच्या उत्तरेकडील कुर्दीश मिलिशिया भागावर विमान आणि तोफखान्याचे हल्ले तुर्कस्तानने शुक्रवारी वाढवले. इस्लामिक स्टेटस्‌च्या अतिरेक्‍यांशी लढणारे अमेरिकी सैन्य माघारी घेतल्यानंतर तुर्कसतानने आपले हल्ले सुरू केले.

तुर्कस्तानच्या सीमेवर असणाऱ्या रास अल इन या शहरावर तुर्कस्तानने हल्ला केला आहे. तुर्कस्तानच्या पश्‍चिमेला 120 किमीवर असणाऱ्या तेल अबायद या शहरावर तुर्कीवर विमानांनी तुफानी बॉम्बहल्ला केला. तेल अबायत गेले तीन दिवस तुफान धुमश्‍चक्री अनुभवत आहे, सीरीयाच्या फौजेचे प्रवक्ते मार्वन क्वामिश्‍लो यांनी सांगितले. इराकच्या सीमेवर असणाऱ्या आइन दिवार या भागातही ठिकठिकाणी दोन्ही बाजुंनी तोफगोळ्याचा जोरदार मारा सुरू आहे. सीरीयाचे 32 जवान आणि 34 बंडखोर या युध्दात आत्ता पर्यंत मरण पावले असल्याची माहिती हाती येत आहे.

दरम्यान सिरीयात मदत कार्य करणाऱ्या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात 64 हजार नागरिकांनी स्थलांतर केले आहे. युरोपीयन युनीयन आपल्या कारवाईला पाठींबा न दिल्यास आमच्या राष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांना युरोपीयन महासंघात पाठवले जाईल, असा इशारा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.