Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

सिनेमॅटिक : सोज्वळपणा गेला कुठे?

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2022 | 6:15 am
A A
सिनेमॅटिक : सोज्वळपणा गेला कुठे?

सागर ननावरे

वेबसिरीजमध्ये सर्रास बोल्ड दृश्‍य दाखवण्याची जणू स्पर्धाच निर्माण झाली आहे. मराठी वेबसिरीजनेही याबाबत हिंदी वेबसिरीजच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

करोना काळात अनेक गोष्टींना नवे पर्याय मिळाले. किंबहुना याआधी अस्तित्वात नसणाऱ्या या पर्यायांनी लोकमनाचा ताबा घेतला. यात सिनेसृष्टीतही ऑनलाइन प्लॅटफॉर्मने रसिक प्रेक्षकांना निखळ मनोरंजन दिले. तो प्लॅटफॉर्म म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म. यात 2-3 तासांच्या सिनेमाला 5-7 भागांच्या वेबसिरीज प्रकारात प्रसारित करून ऑनलाइन सादर केले गेले. ओटीटीच्या या वेबसिरीजला लोकांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतले. यात हिंदी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध वेबसिरीजने कमालीची लोकप्रियता मिळविली.

अशावेळी हिंदी सिनेमाशी स्पर्धा करणारी मराठी सिनेसृष्टी याला अपवाद कशी ठरेल. मराठी वेबसिरीजही ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्या. यातील अनेक वेबसिरीज विशेष लोकप्रियही ठरल्या. पांडू, एक थी बेगम, मुव्हिंग आउट, समांतर यासारख्या मराठी वेबसिरीज चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. हीच नस पकडून प्रेक्षकांची आवड लक्षात घेता निर्माते दिग्दर्शकांनी आपला मोर्चा नवनवीन वेबसिरीजकडे वळविला. सध्या मराठी सिनेसृष्टीत प्रचंड चर्चेत असलेल्या “रानबाजार’ या सिरीजने आणि तिच्या टीजर्सनी इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री प्राजक्‍ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या यामधील बोल्ड सीन्समुळे खळबळ उडाली होती. “ठाकरे’ आणि “रेगे’ या गाजलेल्या सिनेमांनंतर अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन असलेली ही वेबसिरीज चर्चेचा विषय ठरत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेले सीन्स पाहायला मिळणार असल्याचे सांगितलं गेले. खरंतर पहिल्यांदाच एखाद्या मराठी वेबसिरीजमध्ये न्यूड सीन पाहायला मिळणार असल्याने ती विशेष चर्चेत होती.

या वेबसिरीजवरून समाजात विविध मतमतांतरे ऐकायला मिळत आहेत. एकीकडे खूप लोकांनी तेजस्विनी आणि प्राजक्‍ताच्या या भूमिकांचं स्वागत केलं असून एवढा बोल्ड अंदाज स्वीकारण्याचं धाडस केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर दुसरीकडे असा बीभत्स विषय पचनी पडला नसल्याने अनेकांनी त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. ही वेबसिरीज थ्रिलर पोलिटिकल क्राईम प्रकारामध्ये मोडत असताना यातील दृश्‍यांमध्ये मात्र मादकतेच्या मर्यादा पार केल्याचे दाखविले जात आहे. मुळात वेबसिरीजचे निम्मे यश हे त्याच्या ट्रेलरमध्ये दडलेले असते. त्यामुळे ट्रेलर अधिक बोल्ड, भडक करून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न होतो.

राजकीय नेत्यांचा बुरख्यामागचा फसवणूक करणारा धोकेबाज चेहरा आणि त्यांचं धूर्त वागणं कसं असतं हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच हे राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता राखण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जातात, याचं संपूर्ण चित्रण या सिरीजद्वारे दाखविले आहे. परंतु यापेक्षा यात दाखविण्यात आली ती मादक, गडद आणि बीभत्स दृश्‍ये. हीच मादकता लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करते हा दिग्दर्शकांचा विश्‍वास इथे सफल ठरतोय. दुसरीकडे यातून समाजमनावर काय कोरलं जातंय याबाबत चिंताही व्यक्‍त केली जात आहे.

ही वेबसिरीज 18 वर्षांवरील प्रौढांसाठी आहे हे आवर्जून नमूद केलं जातंय. मात्र, ऑनलाइन अभ्यासामुळे ज्या शालेय मुलांच्या हाती मोबाइल पडले आहेत ते अशा वेबसिरीजपासून कसे वाचतील? यातून त्यांनी काय धडे घ्यायचे? यातून मुलांनी नेमक्‍या कोणत्या प्रवृत्तीचे अनुकरण करायचे? कोणत्या भूमिकेचा आदर्श घ्यायचा? याबाबत मुलांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर पालकांनी काय उत्तरे द्यायची? आदी प्रश्‍नांची उत्तरे नक्‍कीच अनुत्तरित आहेत.

परंतु एकीकडे हे समाज स्वास्थ्य जपताना आणि संस्कारांची री ओढताना हे फक्‍त मराठी सिनेसृष्टीलाच लागू होते का, याचादेखील विचार करावा लागेल. मराठीपेक्षा सवंग लोकप्रिय ठरणाऱ्या हिंदी, इंग्रजी बोल्डनेसने खचाखच भरलेल्या वेबसिरीजचे काय? त्यावर कसे नियंत्रण आणणार? या बाबीही पडताळून पाहाव्या लागतील.

कुणावरही काहीही अश्‍लील शेरेबाजी, शिवीगाळ, मादक, हिंसक दृश्‍ये हा वेबसिरीजचा गाभाच आहे. सेक्‍स, सूड आणि सस्पेन्स शिवाय इतर कथानके शक्‍यतो यात पाहायला मिळत नाहीत. द्विअर्थी भाषा, गलिच्छ संवाद आणि इंटिमेट सीन्स यांचा टीआरपी वाढवतात. म्हणूनच अशा या वेबसिरीज मग त्या मराठी वा कोणत्याही भाषेतील असो सोशल मीडियावर या अक्षरशः उच्छाद मांडतात. आजच्या चंगळवादी आधुनिक युगात वेबसिरीजसारखे अनेक प्रकार समाजाचा समतोल बिघडवत चालले आहेत. विशेष म्हणजे यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

अगदी सेन्सॉर बोर्डाचेही. अशा विविध वेबसिरीजसाठी एखादा फिल्टर लावायला हवा. त्याबाबत समाजाने आणि माध्यमांनी विचार करायला हवा. ओटीटीवर केवळ भडक आणि बेताल वेबसिरीजच नाहीत, तर चांगल्या आशयप्रधान विषयांवरील उत्तम वेबसिरीजही आहेत. ज्यांनी सामाजिक समतोल साधत आपला पोत उत्तमरीत्या जपला आहे. समाजपरिवर्तन घडविणाऱ्या वेबसिरीजची अधिकाधिक निर्मिती व्हायला हवी.

रानबाजारच्या निमित्ताने मराठीत तेजीत येणारा हा बाजार समजून घेतला पाहिजे. शासनाने अशा प्लॅटफॉर्मसाठी योग्य ती नियमावली आणायला पाहिजे. आपण इंटरनेट युझर्सवर याबाबत कोणताही दबाव आणू शकत नाही. कारण प्रत्येकाला व्यक्‍तिस्वातंत्र्याचा अधिकार आहेच. आता गरज आहे ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे समजून घेण्याची. राहिला प्रश्‍न आकर्षण असलेल्या रानबाजार या मराठी वेबसिरीजचा, तर अभिनयाचं कौतुक करायचं की अंगाभिनयाचा द्वेष? सिनेसृष्टीतील ओल्ड मराठीचा सोज्वळपणा जपायचा की बोल्ड मराठीचा अश्‍लील मधाळपणा? हे सुज्ञ रसिक प्रेक्षकांनीच ठरवायचे आहे.

Tags: editorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?
अग्रलेख

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?

4 days ago
कटाक्ष : फुले का पडती शेजारी?
संपादकीय

कटाक्ष : फुले का पडती शेजारी?

4 days ago
नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर
संपादकीय

नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर

4 days ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

भक्‍ती अन्‌ शक्‍ती…! अडचण काळात पोलिसांनाही मदत 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेत

शिंदे सरकारची मोठी खेळी ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी देणार ?

शहरी गरीबचे कार्ड क्षेत्रीय कार्यालयात

सेवाशुल्कवाढीने पशुपालक अडचणीत

“वायसीएम’मध्ये औषधांचा तुटवडा कायम

शहरावर पाणीटंचाईचे संकट

तब्बल १० तासांच्या ED चौकशीनंतर संजय राऊत म्हणाले…

बॅगेत 2 खवले मांजर, 35 कासव, 50 सरडे आणि 20 साप आढळल्याने दोन भारतीय महिला अटकेत

फडणवीसांची नाराजी कायम? सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार

Most Popular Today

Tags: editorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!